📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जि.प. मा. शाळा थेरला येथील विद्यार्थ्यांची वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने रक्तगट तपासणी”  

जि.प. मा. शाळा थेरला येथील विद्यार्थ्यांची वसंतदादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने रक्तगट तपासणी”
पटोदा, दि.२७ ऑगस्ट  रोजी येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.)संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक  शाळा थेरला येथील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून थेरला  जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप काळे सर लाभले होते. तर व्यासपीठावर  वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. बळीराम राख, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. सोनाजी गायकवाड, पदव्युत्तर विभागाचे संचालक डॉ. गणेश पाचकोरे, आणि खेरला गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. बबनराव  राख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर थेरला गावचे भूमिपूत्र आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर यांचाही सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर शाळेतील शिक्षक श्री.धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविकात शाळेमध्ये महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रक्तगट तपासणी शिबिरा विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर यांनी आपल्या मनोगतातून  महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यातील सामंजस्य कराराच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर ,’ मीही याच शाळेचा विद्यार्थी असून या शाळेविषयी मला  आत्मियता आहे, त्यामुळे या निमित्ताने मला शाळेसाठी काहीतरी भरीव कार्य करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल “,अशा प्रकारची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप काळे सर यांनी, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आमच्या शाळेची  निवड केली, म्हणून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांना येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये आव्हानांना सहज सामोरे जाता येईल,” अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर रक्तगट तपासणी शिबिराच्या कार्यासाठीही हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळा थेरला येथील शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सलीम तांबोळी सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. वैजनाथ जायभाये यांनी मानले. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच रक्तगट तपासणी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख सर यांच्या हस्ते पार पडले . यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि महाविद्यालयातून आलेला प्राध्यापक वृंद हजर होता. रक्तगट तपासणीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका मीनल क्षीरसागर,श्रद्धा देशमुख आदित्य जायभाये आणि आकांक्षा जोगदंड यांची टीम कार्यरत होती. तर त्यांना सहकार्य करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. जालिंदर लोनके प्रा. विनोद उगले, प्रा. चंद्रशेखर बनसोडे,प्रा. दिनेश राऊत, प्राध्यापिका ऋतुजा खेडकर,प्रा. गोकुळ कंठाळे, प्रा. प्रदीप मांजरे  इत्यादींनी परिश्रम घेतले. याशिवाय जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला येथील, श्रीमती रेणुका दोडके, श्रीमती लीला पोकळे, श्रीमती अंजना मिसाळ,श्रीमती विनिता खेडकर, श्री बालकृष्ण तांबे,श्री विजय तांबे, श्रीहरी येवले, श्री अशोक कराड,श्रीमती अश्विनी खेडकर, श्री वैजनाथ जायभाये, श्रीमती ललिता राख इत्यादींनी परिश्रम घेतले. या रक्तगट शिबिरामध्ये एकशे पंचेचाळीस        विद्यार्थ्यांनी आपला रक्तगट तपासून घेतला.
Back to top button