📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रोटरी क्लब ऑफ बीड व बियाणी मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लीनिकचा संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्यासाठी मोफत तपासणी शिबिर

रोटरी क्लब ऑफ बीड व बियाणी मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लीनिकचा संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्यासाठी मोफत तपासणी शिबिर

बीड

विद्यार्थ्यांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती व्हावी आणि लहान वयातच दातांच्या स्वच्छतेच्या योग्य सवयी रुजाव्यात, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बीड व बियाणी मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निरोगी दात–आनंदी जीवन’ या संकल्पनेअंतर्गत मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, नाथापूर आणि जवळा माध्यमिक विद्यालय, जवळा येथे हे शिबिर घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी करण्यासोबतच दातांची स्वच्छता व निगा राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष सीए श्रीगोपाल लड्डा व सुहास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्पप्रमुख जीवन डोळस व उदय मुसळे यांनी शिबिराचे नियोजन करून विशेष परिश्रम घेतले. प्रकल्प समन्वयक प्रमोद निनाळ यांचे सहकार्य लाभले. प्रा. अभय पटवारी यांनी नियोजन व मार्गदर्शन केले.
शिबिरात डॉ. रमण बियाणी, डॉ. श्वेता टेकवाणी व डॉ. स्वाती गुट्टे यांच्या तज्ज्ञ पथकाने विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना नियमित दात घासणे, योग्य पद्धतीने दातांची निगा राखणे, दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी, योग्य आहार आणि मौखिक आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दंत तपासणीदरम्यान आढळणाऱ्या समस्यांबाबतही विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळा, नाथापूरचे मुख्याध्यापक सारडा, कुलकर्णी व शिक्षकवृंद तसेच जवळा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डोंगरदिवे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. डॉक्टरांच्या सेवाभावी योगदानाबद्दल रोटरी क्लबतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांचे निरोगी हास्य हेच या सेवाभावी उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Back to top button