📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांच्या पाठपुराव्याला यश

भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांच्या पाठपुराव्याला यश

निवेदनाची त्वरित दखल;खड्डेमय रस्ता दुरुस्त

जामखेड प्रतिनिधी:जामखेड ते जवळा या मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्याबाबत भाजपचे अहिल्यानगर जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ रामभाऊ हजारे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात येत संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करत रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुरू केले.

गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती.
निवेदनानंतर तत्काळ खडी व डांबराचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले असून रोलरद्वारे रस्ता समतल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होत नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

त्वरित दखल घेऊन काम सुरू केल्याबद्दल आजिनाथ रामभाऊ हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांच्यासह संपूर्ण प्रशासनाचे आभार मानले. तसेच भविष्यात कायमस्वरूपी व दर्जेदार रस्ता दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button