बीड

चौसाळा ते वाढवणा रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे सरपंच लोढा यांच्या प्रयत्नाला यश

चौसाळा ते वाढवणा रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे
सरपंच लोढा यांच्या प्रयत्नाला यश

बीड दि.31(प्रतिनिधी)ः- चौसाळा ते वाढवणा या रस्त्याच्या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी मागणी केली होती. त्यावेळी माजी मंत्री क्षीरसागर यांनी तातडीने पंतप्रधान योजनेतून हा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याचे काम आता प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याची माहिती बाबूशेठ लोढा यांनी दिली आहे.
चौसाळा ते वाढवणा या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या भागातील ग्रामस्थांनी चौसाळा येथील सरपंच बाबुशेठ लोढा यांच्या माध्यमातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी केली होती. तेव्हा माजी मंत्री क्षीरसागर यांनी तातडीने पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत या रस्त्याला मंजुरी मिळवून घेतली, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामही सुरू करण्यात आले. आज हे काम जवळपास पूर्ण होत असून पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पुर्ण होणार आहे. या भागातील ग्रामस्थांनी देखील माजी मंत्री क्षीरसागर यांना भेटून रस्त्याचे काम सुरू झाल्याची माहिती दिली होती. आज हा रस्ता पूर्णत्वाकडे गेल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button