गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांचे उपस्थितीत शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन, भव्य रँली काढत उमेदवारी अर्ज दाखल

गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांचे उपस्थितीत शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन, भव्य रँली काढत उमेदवारी अर्ज दाखल
मंडणगड प्रतिनिधी दि. 20- निवडणुक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी गृहराज्य मंत्री ना.योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाकडून दोन जिल्हापरिषद गट व चार पंचायत समिती गणा करिता उमेदवारांचे उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे यांच्याकडे सादर करण्यात आले. (20) जानेवारी 2026 रोजी शिंदे गटाने तालुक्यात असलेली आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तालुक्याचे ग्रामिण भागातून हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत भिंगळोली महापुरुष मंदिर ते मंडणगड व मंडणगड ते तहसिल कार्यालय भिंगळोली अशी जोरदार रँली काढली या रँलीत गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. रँली तहसिल कार्यालयात आल्यावर प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, अनिल रटाटे, दीप्ती घडशी, दीपक मालुसरे, प्रणाली चिले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, नितीन म्हामुणकर, चेतन सातोपे, इरफान बुरोंडकर, आनंद भाटे, सिध्देश देशपांडे, संदेश चिले, विनोद जाधव, संजय शेडगे, योगेश जाधव, दीपक घोसाळकर, वसीम चिपोलकर, विकास पवार, यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सर्व शाखाप्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



