मोफत आरोग्य तपासणी सप्ताह संपन्न सद्गुरू प पू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल चा उपक्रम

मोफत आरोग्य तपासणी सप्ताह संपन्न
सद्गुरू प पू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल चा उपक्रम
*माजलगाव प्रतिनिधी-श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ७ ते १४ सप्टेंबर दरम्यान माजलगाव तालुक्यातील सात गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात, तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, पात्रुड, आळसेवाडी, सादोळा, नित्रुड व केसापुरी येथे सदरील आरोग्य शिबीर घेण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. यामध्ये बी पी, शुगर, तपासणी, इसीजी, फेजिओथेरेपी , नाडी परीक्षण करून पुढील उपचार देण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबीरासाठी सद्गुरू प पू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर येथील डॉ गौरकर, डॉ कृष्णा खैरनार तसेच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज & कॅन्सर रिसर्च सेंटर येथील नर्सिंग, बीएएमएस, फेजिओथेरेपी चा स्टाफ सर्व ठिकाणी उपस्थित होता व श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा पात्रुड येथील तेजोनिधी फार्मास्युटिकल्स आयुर्वेद एजन्सी औषधे उपलब्ध होते. आरोग्य तपासणी शिबिर सप्ताह यशस्वी करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील समस्त सेवेकरी परिवार यांनी प्रयत्न केले.



