बीड
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची परंपरा कायम

बीड (प्रतिनिधी):- येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025-2026 निकालाची परंपरा कायम राखली आहे. आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड या संस्थेचे अध्यक्ष बी.एस. धुतालमल, सचिव अॅड.व्ही.बी. मगर सर्व संचालक मंडळ, मुख्याध्याप बी.ए.हावळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये प्रथम आदित्य सुरेश शिरसाट, द्वितीय सुरज विलास मुंडे, तृतीय करण दिनकर मुंडे या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले आहे. ऋतिक दिनकर ढोकणे, कु.समृद्धी विशाल गालफाडे, अभिषेक सुभाष मस्के, मानसी रमेश खंडाळे यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांची सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, हितचिंतकांनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.