बीड

तंत्रज्ञानामुळे शिक्षणात नवी झेप: सभापती प्रा. राम शिंदे

तंत्रज्ञानामुळे शिक्षणात नवी झेप: सभापती प्रा. राम शिंदे

तपनेश्वर जि.प.शाळेत इंटरॅक्टिव्ह पॅनल चे लोकार्पण

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, तहसीलदार धनंजय बांगर, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार,गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख राम निकम, केंद्र प्रमुख भास्कर नरसाळे, नगरसेविका संगीता भालेराव, नंदा होळकर, अमित चिंतामणी,आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, प्रविण होळकर, डॉ. विठ्ठल राळेभात, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, तंत्रज्ञानामुळे ग्रामीण-शहरी दरी कमी होईल व विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साध्य होईल, तंत्रज्ञानाने शिक्षणात नवी झेप घेतली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार,मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, प्रताप पवार, संजय आरेकर, जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे यांनी परिश्रम घेतले.

प्रा. शिंदे यांच्या हस्ते ६५ इंची संवादात्मक फलक, ई-शिक्षण प्रणाली, बिनतारी की-बोर्ड, सूचक उपकरण व अखंड वीजपुरवठा यंत्रणा देण्यात आली. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व संवादात्मक शिक्षण मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे त्यांच्या निधीतून आतापर्यंत ३४३ शाळांना डिजिटल साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

चौकट
शाळेसाठी हक्काचा रस्ता द्या
—————————————-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ ये-जा करण्यासाठी तसेच पालक, अधिकारी व मान्यवरांना कार्यक्रमावेळी अडचण होऊ नये, यासाठी तपनेश्वर जि.प. शाळेसाठी हक्काचा रस्ता तातडीने खुला करण्यात यावा अशी ठाम मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना सादर केले.
शासनाकडून शाळेसाठी धान्य व पाठ्यपुस्तके नियमित येत असली तरी रस्ता नसल्याने वाहने थेट शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. परिणामी साहित्य मुख्य रस्त्यावर उतरवून हाताने वाहून न्यावे लागते, ज्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
या प्रश्नासाठी नवलाखा, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी यापूर्वी आमदार रोहित पवार, जामखेड नगरपरिषद, पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडेही सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Back to top button