बीड

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बीड प्रतिनिधी (दि. 11 एप्रिल 2026)
येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ब्रह्मनाथ मेंगडे, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या श्रीमती सोनवणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महादेव जगताप यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतात डॉ.जगताप यांनी सांगितले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजात विज्ञानवादी विचारसरणी रुजवून समतेचा संदेश दिला. त्यांनी कोणत्याही जाती-धर्माच्या चौकटीत न अडकता सर्व समाजासाठी कार्य केले. महापुरुषांची विचारधारा ही सर्व धर्मांसाठी उपयुक्त असून ती मानवतेचा मार्ग दाखवणारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, महात्मा फुले हे शेतकरी व दीनदुबळ्या घटकांचे खरे आधारस्तंभ होते. परंतु आजच्या काळात महापुरुषांना जातीय चौकटीत विभागण्याचा प्रयत्न होत असून, अशी समाजव्यवस्था देशहितासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनोजकुमार नवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रामचंद्र गिराम यांनी केले.
कार्यक्रमास बहुसंख्या शिक्षक विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button