बीड

पिंपळनेरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा; पिंपळनेरच्या लेकीची बीड पोलीस दलात निवड

पिंपळनेरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा; पिंपळनेरच्या लेकीची बीड पोलीस दलात निवड
पिंपळनेर : पिंपळनेर येथील युवक पांडुरंग नरवडे यांची लातूर पोलीस दलात नियुक्ती झाली असतानाच त्यानंतर आता पिंपळनेर येथील कु. शितल अवधूत गवळी हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर बीड पोलीस दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे .
त्यामुळे पिंपळनेर च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे शितलच्या वडिलांचा व्यवसाय शेती असून अत्यंत साध्या परिस्थितीतून
तिने हे यश संपादन केले आहे. 12 वी नंतर शितलने बीड शहरात शिक्षणासोब अनेकदा विविध विभागाच्या क्षेत्रात परीक्षा देऊन प्रयत्न केले होते, तेव्हा अपयश आलं पण तिने जिद्द सोडली नाही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले तिच्या या जिद्दीपुढे सर्व अडथळे दूर करत आज अखेर तिचे स्वप्न साकार झाले. शेतकरी कुटुंबातील मुलीने पोलीस दलात भरारी घेतल्याने पिंपळनेर गावात आनंदाचे आणि अभिमानाचे  वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांकडून व मित्रपरिवाराकडून तसेच विविध मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शितल गवळी हिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला मुलींना प्रेरणा मिळणार असून जिद्द असेल तर यश नक्की मिळते हे पुन्हा एकदा पिंपळनेरकरांना या लेकीने  सिद्ध करून दाखवले आहे.
Back to top button