बीड

अमोल धन्वे यांची युवा रिपाइंच्या बीड शहर सचिवपदी निवड

अमोल धन्वे यांची युवा रिपाइंच्या बीड शहर सचिवपदी निवड
पप्पू कागदे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

बीड / प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून विविध चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून चळवळीत काम करणारे भीमराज नगर राजुरीवेस बीड येथील धडाडीचे युवक कार्यकर्ते अमोल अशोकराव धन्वे यांच्या कामाची दखल घेऊन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल धन्वे यांची युवा रिपाइंच्या बीड शहर सचिव पदी निवड करण्यात आली.
   निवडी प्रसंगी नवनिर्वाचित युवक रिपाइंचे बीड शहर सचिव अमोल धन्वे म्हणाले की, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरात युवकांचे संघटन करून मजबूत पक्ष बांधणीचे काम आगामी काळात इमाने-इतबारे करणार आहे.
   या निवडी प्रसंगी राजू जोगदंड, अविनाश जोगदंड,
शाम वीर, विलास जोगदंड, महेश कागदे, कपिल ईनकर, नाना कांबळे, बाळू सोनवणे, चिंटू वडमारे, सोनू वडमारे, बाळू सोनवणे, जितू धन्वे, राजपाल टाकणखार, बंटी वडमारे, गौतम कांबळे, प्रवीण वडमारे, विकास जोगदंड, आकाश धन्वे, राम वडमारे, जितू वडमारे, देवा वडमारे, पप्पू साळवे, अजिंक्य वडमारे, ऋषिकेश वीर, रोहित पिल्ले, राहुल साबळे, पप्पू साळवे, ऋषिकेश सोनवणे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button