📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची दखल घ्यावी – श्रीम.योगिता बलाक्षे 

समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची दखल घ्यावी – श्रीम.योगिता बलाक्षे
गेवराई, दि.२३ (प्रतिनिधी)-समग्र शिक्षा योजनेतील 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीबाबत समग्र शिक्षा संघर्ष समिती द्वारा आझाद मैदानावर 9 मार्च पासून सुरू असलेल्या अन्नत्यागआंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा . समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता मराराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (DIET) संघटना तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद  यांनी देखील आपला पाठींबा जाहीर केला आहे.  तसेच महाराष्ट्र राज्यच राजपत्रित अधिकारी डायट संघटना तसेच विविध आमदार यांनी पण जाहीर पाठिंबा दर्शविला आहे तसेच या आंदोलनाची राज्य शासनाने त्वरित दखल घेऊन या 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत त्वरित कायम करून घ्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहेत . त्याचप्रमाणे अशीच मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यध्यक्ष तथा माझी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मा .एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री मा .दादाजी भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे तसेच समग्र शिक्षा योजनेतील 3387 कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री मा .देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी संघर्ष समितीने म्हटले आहे सेवेमध्ये कायम करण्याचा निर्णय घोषित करावा एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेत समग्र शिक्षा संघर्ष समिती द्वारा आयोजित आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेऊन कायम करावे अशी मागणी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीमती योगिता बलाक्षे मॅडम यांनी केले आहे .
Back to top button