बीड

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बीडमध्ये भव्य मिरवणूक; जयंती उत्सव समितीची घोषणा-अॅड. सुधीर जाधव

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बीडमध्ये भव्य मिरवणूक; जयंती उत्सव समितीची घोषणा-अॅड. सुधीर जाधव
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 150 व्या सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी बीड शहरात भव्य मिरवणूक व विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती उत्सवात परीट समाज बांधवांसह सर्व गाडगेबाबा प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जयंती उत्सव कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा सांस्कृतिक सभागृह, मोंढा रोड, बीड येथे मठामध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार असून ही मिरवणूक बशीरगंज, कारंजा, बलभीम चौक, धोंडीपुरा, माळवेस मार्गे मार्गक्रमण करत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे. तेथे महाप्रसादाने जयंती उत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
या जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या समाजसुधारक विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे आवाहन महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाजसेवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा विभागीय युवक अध्यक्ष सुधीर जाधव, राज्य कार्याध्यक्ष गणेश जगताप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय जाधव, शहराध्यक्ष अंबादास नवले, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश घोडके, रवी जाधव, विलास जाधव, पप्पू शिंदे, जगन्नाथ शिंदे, मनोज वाघमारे, गणेश राऊत, जयंत राऊत, जिल्हा सचिव प्रवीण साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष जिजा शिंदे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष मंगेश घोडके, उपाध्यक्ष शितल राऊत, कार्याध्यक्ष संतोष भालेकर, शहर सचिव अतुल साळुंखे, प्राध्यापक विजय जाधव, अमोल काळे, मनोज नवले, तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष संजय साळुंके, उपाध्यक्ष नितीन नवले आणि सचिव महेंद्र वाघमारे यांनी केले आहे
Back to top button