बीड

शिखर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व शालेय साहित्य प्रदर्शन उत्साहात

शिखर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व शालेय साहित्य प्रदर्शन उत्साहात

मांजरसुंबा /  मांजरसुंबा येथील शिक्षण क्षेत्रात नावाजलेली

व अग्रस्थानी असणारी शिखर पब्लिक स्कूलमध्ये दि १७ जानेवारी २०२६ रोजी स्व. अँड. बळवंतराव कदम यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन व शालेय साहित्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग, नावीन्यपूर्ण संकल्पना व शालेय साहित्याचे आकर्षक सादरीकरण केले. प्रयोगांमधून विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आल्याने उपस्थित विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने भेट देत भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भारत बप्पा काळे, दैनिक सूर्योदयचे कार्यकारी संपादक दिपक काळकुटे,सरपंच अरुण काका रसाळ, श्रीराम आप्पा घोडके (सरपंच), डॉ. पा. म. वि. माजी मुख्याध्यापक विष्णुपंत रसाळ, नामदेव घोडके सर, सनराईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सातपुते सर, जगन्नाथ घोडके, अँड. नितीन रांजवण सर, सतीश सवासे,

नारायण खुटाळे, दादा रसाळ, जि. प. शाळेचे अरबने सर, खान सर, बनसोडे मॅडम, डॉ. प्रशांत स्वामी, नितीन बांगर, संदीप कदम, नितीन कदम, संदीप इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड व आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्या आशा कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. एकूणच हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरला.

Back to top button