बीड
माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त श्री दत्त संस्थान, बालाघाट येथे भव्य उत्सव सोहळ्याचे आयोजन

बीड | प्रतिनिधी
श्री दत्त संस्थान, बालाघाट, कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे प.पू. ष.ब्र. श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर) यांच्या कृपाशीर्वादाने तसेच दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माघ शुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावाने साजरा होणार आहे.
माघ शुद्ध पौर्णिमेला दत्त उपासनेला विशेष महत्त्व असून या दिवशी दत्त दर्शन, जप, ध्यान व सेवा केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर श्री दत्त संस्थान, बालाघाट येथे सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी हा दिवस अत्यंत पावन आणि मंगल ठरणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादासाठी श्री. गणेश महादेव उनवणे, रुई (गेवराई) व माऊली शिवाजी बोबडे, जळगाव माजरा यांनी अन्नदानाचा पुण्यलाभ घेतला आहे.
श्री दत्त संस्थानच्या वतीने सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या पावन माघ शुद्ध पौर्णिमा उत्सवाला उपस्थित राहून दर्शन, पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उत्सव श्रद्धा, भक्ती व उत्साहाच्या वातावरणात संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.