बीड

शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय ; पालक-शिक्षक संघ ही विद्यार्थिनींच्या यशाची मजबूत पायरी – सुरेश भोसले

शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय ; पालक-शिक्षक संघ ही विद्यार्थिनींच्या यशाची मजबूत पायरी – सुरेश भोसले

कन्या विद्यालय येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

जामखेड दि.४ जुलै प्रतिनिधी –रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, जामखेड येथे आज पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य सुरेश भोसले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर राळेभात उपस्थित होते.यावेळी प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, वकील महारुद्र नागरगोजे, मुख्याध्यापिका सौ. रोहिणी भोर, पर्यवेक्षक संजय हजारे,अशोक घोडके, गणेश जाधव, राजेंद्र ठोंबरे,मिरा साळुंके,स्वाती लोंढे, वैशाली नवले यांच्यासह अनेक माता-पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कन्या विद्यालयात पालक- शिक्षक संघाच्या बैठकीत सुरेश भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की,शाळेच्या गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस उंचावतो आहे आणि त्यामुळेच प्रवेशसंख्या देखील वाढत आहे, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थिनींचा प्रयत्न एकत्र आला, तर शाळेचा विकास निश्चितच अधिक वेगाने होईल.पालक शिक्षक संघाची स्थापना ही विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी मजबूत पायरी आहे.

मुख्याध्यापिका रोहिणी भोर यांनी प्रास्ताविक करत शैक्षणिक व उपक्रमात्मक प्रगतीची थोडक्यात माहिती दिली. पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेचे महत्त्व स्पष्ट करत, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय गरजेचा असल्याचे सांगितले.

या मेळाव्याच्या माध्यमातून पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक एकत्र येऊन काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.शाळेच्या शैक्षणिक व उपक्रमात्मक प्रगतीची माहिती संतोष शिंदे यांनी दिली,यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुदेव बडे, नामदेव सरकुंडे यांनी तर आभारप्रदर्शन मोहन यादव मानले.

Back to top button