बीड

लिंबागणेशच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार असणाऱ्या वटवृक्षाला भिषण आग; २ तासानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेशच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार असणाऱ्या वटवृक्षाला भिषण आग; २ तासानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- ( दि.२९ ) बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती देवस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या अडीचशे वर्षांपूर्वीचा ४-५ पिढ्यांचा लिंबागणेशच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार असणा-या वटवृक्षाला आज दि.२९ मंगळवार रोजी सकाळी आग लागली. डॉ.गणेश ढवळे, विक्रांत वाणी यांनी बीड नगरपरीषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधुन दुर्दैवी घटनेची कल्पना दिली.अर्ध्यातासात बीड नगर परीषदेचे अग्निशामक दलाचे रमेश आदमाने,अक्षय नखाते आणि वाहन चालक अनिकेत कपाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.दरम्यान पाणी संपल्याने लिंबागणेश येथील गावाला टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या दादाराव येडे यांनी विनामूल्य आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बीड वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना कळल्यानंतर वनविभागाचे दोन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक परिसरातील जवळपास अडीचशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला आज सकाळी ९ च्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी याठिकाणी गर्दी केली होती. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले.आगीत वटवृक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व विक्रांत वाणी यांनी बीड अग्निशामक दलाला तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोटो आणि व्हिडिओ पाठवुन वडाला लागलेल्या आगीची कल्पना दिली. या झाडांवर वास्तव्यास असलेल्या पक्षांची घरटी आगीत जळून खाक झाली.

मानवी निष्काळजीपणामुळे आगीच्या घटनेत वाढ :- डॉ.गणेश ढवळे

उन्हाची तिव्रता वरचेवर वाढत चालली आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांनी कचरा व शेतकऱ्यांनी खोडवा पेटवण्याच्या घटनांमुळे वृक्ष आगीत होरपळून जात आहेत. ग्रामस्थांनी वारंवार आवाहन करूनही वृक्षांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.  पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी प्रत्येक माणसाने वृक्ष लागवड,वृक्ष संगोपन आणि आगीपासून संरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे वृक्षप्रेमी डॉ.गणेश ढवळे यांनी आवाहन केले आहे.

Back to top button