रोहा दिवा मेमो गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवासी संतप्त, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रवाशी झाले शांत

रोहा दिवा मेमो गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवासी संतप्त, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रवाशी झाले शांत
उ रा जिल्हा प्रतिनिधी-: नारायण म्हात्रे
रोहा येथून सुटणारी रोहा दिवा मेमो रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे नागोठणे रेल्वे स्थानकात बंद पडली. गाडी का थांबली याची कोणतीही माहिती प्रवाशांना न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले. काही कळायच्या आत प्रवाशांनी रेल्वे स्टेशन डोक्यावर घेतले व लागलीच स्टेशन मास्तरला घेराव घालून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यामुळे एवढी गडबड उडाली की, एवढ्या प्रवाशांना उत्तर द्यायचे कसे हे त्याला समजे ना, त्याचे झाले असे की, बुधवार २८ मे रोजी रोहा येथून दुपारी ३:५५ वाजता सुटणारी रोहा दिवा रेल्वेच्या इंजिनमध्ये निडी स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याचे रेल्वे चालकाच्या निदर्शनास आले, सदरील गाडी चालकाने कमी वेगात व काळजीपूर्वक संध्याकाळी ०५•१७ च्या दरम्यान नागोठणे रेल्वे स्थानकात आणली. गाडी बराचवेळ उभी असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, संतप्त झालेले प्रवासी स्टेशन मास्तराच्या कार्यालयात जाऊन जाब विचारू लागले सदरील गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रवाशांची जास्त गैरसोय होवू नये म्हणून दुरुस्तीच्या कामासाठी पनवेल स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून टेक्निशियन पाठविण्यासाठी त्वरित संपर्क साधून त्याठिकाणाहून इंजिन दुरूस्तीसाठी टेक्निशियन पाठविण्यात यावे याकामासाठी टेक्निशियन येवून तातडीने इंजिनमधील तांत्रिक अडचण दूर केली सदरची गाडी सायंकाळी ०२•२० मिनिटे थांबली म्हणजे साधारणतः ०७•४० दरम्यान पनवेल कडे रवाना करण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्तर यांनी दिली.
रेल्वेगाडी बंद पडण्याची माहिती नागोठणे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार महेश लांगी, गणेश भोईर, प्रसाद पाटील, समीर म्हात्रे, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव यांच्यासह रेल्वे स्थानकात जाऊन गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून सर्व प्रवाशांची समजूत काढून शांत केले व थोड्या वेळाने इंजिन दुरूस्त झाल्यावर सर्व प्रवाशांना गाडीत बसवून गाडी पनवेलकडे रवाना झाली.



