बीड

महापुरानंतर तब्बल सहा दिवस धामणगाव अंधारात; महावितरणच्या निष्क्रिय कारभारावर संताप – विजय आण्णा गाढवे

महापुरानंतर तब्बल सहा दिवस धामणगाव अंधारात; महावितरणच्या निष्क्रिय कारभारावर संताप – विजय आण्णा गाढवे
आष्टी प्रतिनिधी :-धामणगाव परिसरात आलेल्या महापुरानंतर तब्बल सहा दिवसांपासून गाव अंधारात आहे. गावात वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल होत असून, या गंभीर समस्येकडे महावितरण अजिबात लक्ष देत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला अंधार आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे धामणगावकरांची परिस्थिती आणखी बिकट झाली असून, दिवसभराच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
दरम्यान, महावितरणचा कारभार पूर्णपणे मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आपत्तीच्या काळात महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू राहायला हवे होते, मात्र प्रत्यक्षात कामकाज ठप्प असल्याने गावातील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.
या संदर्भात रा. कॉं. पा. श.प. गटाचे तालुका अध्यक्ष विजय आण्णा गाढवे यांनी प्रशासन आणि महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. “धामणगावकरांच्या अडचणी तातडीने दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली
Back to top button