बीड

बीड येथील कृषी प्रदर्शनात येणार थेट शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य!

बीड येथील कृषी प्रदर्शनात येणार थेट शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य!
——————————————
 *शेतमजुरीला पर्याय ठरणारे अवजारे दालन ठरणार आकर्षण*
——————————————-
बीड (प्रतिनिधी ) मराठवाड्यातील शेतकर्यांना  तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने  गेल्या 18 वर्षांपासून किसान कृषि विकास प्रतिष्ठानच्या  या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या वर्षी प्रथमच बीड येथील  छत्रपती संभाजी महाराज क्रीडागणा मध्ये   दिनांक 03 ते 06 एप्रिल दरम्यान  किसान कृषी महोत्सव या कृषि प्रदर्शनात द्वारे  बीड भव्य अशा  4 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शन  जय्यत तयारी सुरू असून यंदा कृषी प्रदर्शनामध्ये 200 अधिक स्टॉलचा सहभाग असणार आहे यात विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे शेतमजुरीला पर्याय ठरणारे अवजारांचे चालन विविध लागणारे निळ्या खुरप्यापासून तो ऊस तोडणी यंत्रापर्यंत सर्व प्रकारच्या मजुरीला पर्याय ठरणाऱ्या अवजाराचे दालन विशेष आकर्षण ठरणार आहे तर शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेला माल थेट स्वतः शेतकरी या प्रदर्शनात धान्य महोत्सवाच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी ठेवणार आहेत या अनुषंगाने प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू असून या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान कृषी प्रदर्शन आयोजन समितीचे संयोजक कृषिभूषण महेश बेदरे यांनी केले आहे.
    मराठवाड्यातील शेतकर्यांना नवतंत्रज्ञान मिळावे म्हणून येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठान   मराठवाडाभर बीड, जालना, परभणी, हिंगोली सह इतर ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करते  बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आग्रहाने गेवराई पाठोपाठ बीड येथे या प्रदर्शनाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महाएपीएसी फेडरेशन, ओंकार साखर कारखाना, ऑल इंडिया डीलर ऍग्रो  इनपुट असोसिएशन यांचा यात विशेष सहभाग प्रदर्शनात  असणार आहे.
कृषी प्रदर्शनात भव्य अशा आठ दालनात द्वारे तब्बल २०० कृषी उत्पादनांची स्टॉल यामध्ये असून कृषी अवजारांची प्रात्यक्षिके या प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहे, एकदिवसीय पशुप्रदर्शन, डॉग शो तज्ज्ञांची चर्चासत्रे  आदी उपक्रम या प्रदर्शनात होणार आहे  विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन व समारोप प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या शेतक यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रदर्शनात विविध कार्यक्रमाचे रिसेल चालणार असून 4 दिवसांमध्ये  या प्रदर्शनाचा बीड शहरासह जिल्ह्यातील शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संयोजक   कृषिभूषण महेश बेदरे यांनी केले आहे
 *चौकट*
***********
 *शेतकऱ्यांना दिला जाणार मोफत स्टॉल*
 शासनाच्या मदतीविना हे प्रदर्शन होत असून गेल्या 18 वर्षापासून शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय ही संस्था हे प्रदर्शन सातत्याने आयोजित करते  यावेळी प्रथमच जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाचा उत्पादित केलेला धान्य माल थेट ग्राहकांच्या च्या दारात मिळावा या उद्देशाने  शेतकऱ्यांना मोफत स्टॉल दिला जाणार आहे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या संस्थांना अल्प दरात स्टॉल दिला जाणार आहे स्टॉल बुकिंग साठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा 9881045315,9422294338,8600474606
Back to top button