बीड

धर्माबाद पोलीस स्टेशन येथील खळबळ जनक प्रकार उघडकीस तक्रारदाराला दिले समजपत्र आरोपीवर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही.

धर्माबाद पोलीस स्टेशन येथील खळबळ जनक प्रकार उघडकीस तक्रारदाराला दिले समजपत्र आरोपीवर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही.

श्री माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेतीमालाची खरेदी करुन पैसे देत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नांदेड जिल्हा प्रतिनिधी -तीरुपती मारोती शिंदे, रा.लाब्दी, मंडळ.बासर, जि. निर्मल येथील रहिवाशी असून

मागील काही कालावधीपासुन बासर रोड धर्माबाद येथे त्रिशु पाटील लाब्दीकर या नावाने शेतीमाल खरेदी विक्री करण्याचा व्यवहार करीत आहे.

माझ्याकडे आलेला माल मी धर्माबाद येथील कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत अनुज्ञप्तीधारक श्री माहेश्वरी ट्रेडर्स धर्माबादचे प्रो. प्रा. योगेश श्रीगोपाल छापरवाल यांच्याकडे देत होतो त्यांनी माझ्याकडील मालाचे पैसे वेळोवेळी दिले असल्याने माझा त्यांच्यावरील विश्वास असल्याने मी त्यांच्याकडेच माझ्याकडील माल देत होतो.

दिनांक 28.02.2025 रोजी चना ज्याचे एकुण वजन 30290 किलो व दिनांक 04.03.2025 रोजी चना ज्याचे एकुण वजन 30210 किलो विक्री केले आहे ज्याची एकुण किंमत जवळपास बत्तीस लाख रुपये होत आहे. माल विक्री केल्यानंतर मी त्यांना पैश्याची मागणी केल्यानंतर आज माझ्याकडे पैसे नाहीत मी तुम्हाला नंतर पैसे देतो असे सांगीतले होते.नंतर पैसे मला मिळतील या आशेवर राहिलो.

कांही दिवसांनंतर मी योगेश छापरवाल यांना माझे त्यांच्याकडे येणे असलेल्या पैश्याबद्दल विचारणा केली असता थोडे थांब मी तुमचे पेमेंट करतो म्हणुन विनंती केली त्यानंतर परत मी त्यांना पैश्याब‌द्दल विचारणा केली असता आज-उ‌द्या म्हणुन चालढकल केली. मला माझे पैसे मिळत नसल्याने मी त्यांच्या दुकानात जाऊन पैश्याची मागणी केली असता मी तुला पैसे दिलो आहे व माझ्याकडे तशी चिठ्ठी आहे अशी बतावणी करुन उडवा-उडवीचे उत्तरे देऊन तुला पैसे देत नाही तुला काय करायचे ते कर म्हणुन धमकी दिली.

भारतीय न्याय संहितेच्या कलम 318, 410, 210, 411, 412 नुसार त्यांच्यावर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करावा मला माझे पैसे मिळवुन दयावे अशी तक्रार
तिरुपती मारोती शिंदे यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे केली होती

पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनाच उलट समजपत्र देवून हे प्रकरण महसूलशी निगडित आहे असे समजपत्र दिल्याने पोलीस कोणाला का व कशासाठी वाचवित आहेत अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये होत आहे.

Back to top button