बीड
तुम्ही पण कर सल्लागारांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असाल तर सावधान…

तुम्ही पण कर सल्लागारांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असाल तर सावधान…
गेवराई येथील व्यापाऱ्याच्या जीएसटी नंबर वर कर सल्लागाराने केला 73 लाखाचा घोटाळा
गेवराई (प्रतिनिधी) शहरातील व्यावसायिकाच्या जीएसटी खात्याचा वापर करून छत्रपती संभाजी नगर येथील कर सल्लागाराने जीएसटी पोर्टरवर बनावट बिले अपलोड करत 73 लाख 63 हजारांचा घोटाळा केला. गोविंद सत्यनारायण लाहोटी रा. (विनायक पार्क देवळाई) असे आरोपीचे नाव असून छत्रपती संभाजी नगर येथील जवाहरलाल नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई शहरातील मधुसूदन सोनी यांचा व्यवसाय आहे. ऑगस्ट 2017 मध्ये त्यांनी लाहोटी मार्फत जीएसटीचे प्रमाणपत्र काढले. तेव्हापासून लाहोटी त्याचे करा संदर्भात काम पाहत होता. जीएसटी नोंदणी वेळी लाहोटीने स्वतःचा मेल मोबाईल नंबर नोंदवला त्यामुळे सोनी यांना कुठलाच ओटीपी येत नव्हता. नोव्हेंबर रोजी सोनी यांना जीएसटी कार्यालयातून पहिली नोटीस आली तेव्हा त्यांना हा घोटाळा समजला. जेव्हा सोनी यांनी लाहोटीला विचारणा केली तेव्हा त्यांनी गैरव्यवहार झाल्याचे मान्य करत प्रकरण मिटून देण्याचे आश्वासन दिले. परंतु पोलिसात तक्रार न करण्यास धमकावले दि. 6 व 31 जानेवारी रोजी पुन्हा सोनी यांना नोटीस आल्या तेव्हा लाहोटीने त्यांच्या जीएसटी खात्यावरून व्यावसायिकांचे नावे बोगस बिले काढल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


