बीड

बारामती ऍग्रो शेतकऱ्यांना चांगलाच दर देणार – सुभाष गुळवे

बारामती ऍग्रो शेतकऱ्यांना चांगलाच दर देणार – सुभाष गुळवे

हाळगावच्या साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरु

जामखेड प्रतिनिधी: २०२५–२६ हंगामात साधणार ११ लाख मे. टन ऊस, त्यापैकी अंदाजे पावणेचार लाख मे. टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांच्या ऊसाला योग्य दर दिला जाईल, असे आश्वासन बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आज (मंगळवार) हाळगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले.

हाळगाव येथील श्रीराम शुगर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोकडे आला असून, बारामती ऍग्रोच्या माध्यमातून तिसऱ्या गाळप हंगामाचा प्रारंभ झाला आहे. यावेळी उपस्थित होते: आदिनाथचे माजी संचालक किसनराव ढवळे, शहाजी पवार पाटील, शिवाजी ढवळे, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, राष्ट्रवादीचे संतोष वारे, सोसायटीचे माजी चेअरमन विलास जगदाळे, उद्योजक मंगेश आजबे, प्रा. संजय वराट आदी.

उपाध्यक्ष गुळवे म्हणाले,हाळगाव येथील कारखान्याकडे परिसरातील साधारण ४० हजार एकर ऊसाची नोंद झाली आहे. हंगाम यशस्वीपणे पार पडावा म्हणून कारखाना प्रशासनाने योग्य देखभाल व दुरुस्ती केली आहे. शेतकऱ्यांनी चांगला ऊस गाळपासाठी द्यावा. त्वरित पैसे आणि योग्य दर ही कारखान्याची ओळख आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न येथून केला जात आहे. या हंगामात २४७ ट्रॅक्टर ट्रॉली व ११९ ट्रॅक्टर गाडी अशी यंत्रणा ऊसतोड व वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे.

पुढे गुळवे म्हणाले, या भागात पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे ऊसाचे प्रमाण जास्त आहे. सभासद व शेतकऱ्यांनी चांगल्या रिकव्हरीचा ऊस द्यावा. शेतकऱ्यांनी चांगला परिपक्व ऊस द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

हाळगाव कारखान्याकडे ऊस गाळपासाठी आष्टी, जामखेड, करमाळा, परांडा, कर्जत, खर्डा, जवळा, मिरजगाव, साकत, कोरेगाव, हाळगाव या गटांतील शेतकरी येतात. कार्यक्रमात ऊसाच्या मोळीचे पूजन करून उपस्थित शेतकरी, ऊस वाहतुकदार आणि मान्यवर यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.

यावेळी उद्योजक अरुण गाडेकर, चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, दूध डेअरीचे चेअरमन अप्पासाहेब मोहोळकर, माजी सरपंच संतोष निगुडे, धांडेवाडीचे माजी सरपंच नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कवादे, गोरख इंगळे, भारत काळे, शरद ढवळे, रावसाहेब ढवळे, अमर चाऊस, रघुनाथ मते, रज्जाक शेख, किरण पवार, बापू ढवळे, जयराम आव्हाड, अमोल बनकर, सचिन नलवडे, धंनजय मोरे, विजय धुमाळ, श्री. डोळे, भारत जाधव, व्हाईस प्रेसिडंट मिलिंद देशमुख, जनरल मॅनेजर संजय घोरपडे, केन मॅनेजर मधुकर मोहिते, चिफ इंजिनिअर बालाजी परबत, चिफ केमिस्ट हेमंत थोरवे आदी.

Back to top button