राजुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय खाडे बिनविरोध

राजुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय खाडे बिनविरोध
सत्तेचा समतोल राखत राजुरीत राष्ट्रवादीची ठसठशीत मोहोर
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाणारी राजुरी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज शांततेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक नेते संजय खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजुरी ग्रामपंचायतीची निवडणूक २०२२ मध्ये पार पडली होती. यावेळी सौ. अश्विनीताई सागर कोल्हे सरपंचपदी तर सौ. कीर्ती नानासाहेब खाडे उपसरपंचपदी निवडून आल्या होत्या. कार्यकाळात दिलेल्या आश्वासनानुसार सौ. कीर्ती खाडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.
रिक्त झालेल्या या पदावर संजय खाडे यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी संजय खाडे यांच्यावरील ग्रामस्थांचा विश्वास यातून अधोरेखित झाला आहे.
या निवडीप्रसंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका कार्याध्यक्ष सागरभाऊ कोल्हे, युवा उद्योजक अस्लम शेख,डॉ. नानासाहेब खाडे, काकासाहेब कोल्हे, ग्रा.सदस्य बाबासाहेब घुले, गौतम फुंदे (मेजर), सूरज गायकवाड, तसेच पोलीस पाटील मोरे सर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर राजुरी गावात समाधानाचे वातावरण असून, नव्याने निवडून आलेल्या उपसरपंचांकडून विकासात्मक कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



