जामखेड येथे राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर ला धडकून इर्टिगा गाडीने घेतला पेट ; दोघांचा होरपळून मृत्यू

जामखेड येथे राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर ला धडकून इर्टिगा गाडीने घेतला पेट ; दोघांचा होरपळून मृत्यू
जामखेड दि.२४;-जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग बीड रोडवरील १ कि.मी अंतरावरील नवले पेट्रोल पंप व नायरा पेट्रोल पंप यांच्या मध्ये एका हॉटेल च्या समोर एक चारचाकी वाहन (इर्टिगा) रस्त्याच्या दुभाजकाला धडकले. यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. या अपघातात जामखेड शहरातील एका पान शॉप सेंटर च्या मालकासह जामखेडच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. ही दूर्दैवी घटना आज दि २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.या अपघात मृत्यू झालेल्या जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल, वय ३५ वर्षे, ब.न. २४९९ व पान शॉप मालक, महादेव दत्ताराम काळे, वय अंदाजे २८ वर्षे, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड आशा दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की मयत मयत महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण आज सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातुन बीड रोडकडुन जामखेड शहराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाने शहरापासून एक कीमी अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली. परिणामी सदरचे इर्टिगा वाहन अत्याधुनिक पध्दतीचे असल्याने गाडी लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गाडी मधील दोघांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे दोघांचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. घटनास्थळी अपघात झाल्या नंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मोबाईल निदर्शनास आला.पोलिसांनी चौकशी करता तो मोबाईल आपल्याच पोलीस कर्मचारी चा लक्षात आले.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.जळालेल्या मृत्यू देहाचे ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .शंशाक शिंदे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.
जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले मात्र तोपर्यंत गाडीने पुर्ण पेट घेतला होता. गाडीत जळुन मृत्यू झालेल्या मध्ये जामखेडचे पोलीस स्टेशन चे कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल वय ३५ व जामखेड शहरातील साईनाथ पाँन शॉपचे मालक महादेव काळे वय ३२ हे होत ईरटीका नंबर
एम् एच १६ डीएम् ५८९३गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडी चा टायर घटनास्थळा पासुन शंभर ते दीडशे फुटावर फेकले गेले.
चौकट
या घटने मुळे पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे ठेकेदार व अधिकारी यांच्या बद्दल नागरिकांमधून रोष निर्माण होत आहे.ही माहिती समजताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,न्यायवैद्दकीय पथक दाखल झाले.अनेक नागरिक मृत्यू होऊन शेकडोलोक अंपग झाले आहे.दोन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात.यामुळे वेगाने असलेली गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



