बीड

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगरनाका दरम्यान यु टर्न नाही ; न्यायालय, जिल्हाधिकारी, तहसिलला जाण्यासाठी पाऊण किलोमीटरचा हेलपाटा ; जिल्हाधिका-यांनी लक्ष्य घालावे :-  डॉ.गणेश ढवळे

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगरनाका दरम्यान यु टर्न नाही ; न्यायालय, जिल्हाधिकारी, तहसिलला जाण्यासाठी पाऊण किलोमीटरचा हेलपाटा ; जिल्हाधिका-यांनी लक्ष्य घालावे :-  डॉ.गणेश ढवळे

बीड:- ( दि.२५ ) बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरातील २ किलोमीटर रस्त्याचे नियोजन शुन्य काम केल्याने दीड वर्ष लोटूनही शहरातील दोन किलोमीटर अंतराचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. याठिकाणी खडी,धुरळा उडुन वाहनचालकांना त्रास होतो. नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनमानी कारभारामुळे व रखडलेल्या कामामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भाने कठोर भूमिका घेत या कामाची पाहणी केल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना पत्र देऊन कंत्राट दाराची मनमानी थांबविण्याचे सुचवत सदर काम कोणत्याही परिस्थितीत एक आठवड्याच्या पूर्ण करण्याचे तसेच कंत्राटदारास एक कोटीचा अतिरिक्त दंड करण्याचे निर्देश दिले आहेत.या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगर नाका दरम्यान यापूर्वी सहा जागेवर यू टर्न घेण्यासाठी जागा सोडण्यात आली होती. सध्या मात्र एकही यु टर्न नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून न्यायालय, तहसील, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाण्यासाठी नागरिकांना आता नगर नाक्याचा पाऊण किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागणार आहे. दुसरीकडे या रस्त्याच्या उत्तर बाजूला मुलींचे वस्तीगृह ,जुनी जिल्हा परिषद (ज्यामध्ये आजही अनेक कार्य सुरू आहेत) न्यायालय ,तहसिल, मुख्य प्रशासकीय इमारत, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय तर दक्षिण बाजूला शासकीय प्रशिक्षण आरोग्य केंद्र, जिल्हा कारागृह, शासकीय विश्रामगृह, चंपावती क्रिडामंडळ ,पंचायत समिती आदी कार्यालये आहेत. त्यामुळे भविष्यात या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व संभाव्य अपघात लक्षात घेता
पूर्वीप्रमाणेच यु टर्न दुभाजकांमध्ये ठेवण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.
Back to top button