बीड

कर्जत नगरपंचायतमध्ये ऐतिहासिक निर्णय; नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांना संधी

कर्जत नगरपंचायतमध्ये ऐतिहासिक निर्णय; नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांना संधी

कर्जत प्रतिनिधी:-कर्जत तालुक्यातील अहिल्यानगर नगरपंचायतमध्ये आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सर्व १३ नगरसेवकांशी सविस्तर चर्चा करून त्यांनी निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना दिला.

उपनगराध्यक्षाने राजीनामा जाहीर केल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त होत आहेत. त्यामुळे उर्वरित कार्यकाळासाठी दोन्ही पदांसाठी एकत्रित निर्णय घेण्यात आला असून, हा कार्यकाळ चार नगरसेवकांमध्ये समानपणे विभागण्याचा निर्णय झाला आहे. याअंतर्गत,

*प्रथम कालावधीसाठी नगराध्यक्षपदी* सौ. रोहिणी सचिन घुले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.उपनगराध्यक्षपदी श्री. संतोष (आप्पा) सोपान मेहेत्रे यांची निवड करण्यात येणार आहे.त्यानंतर,

*द्वितीय कालावधीसाठी नगराध्यक्षपदी*

सौ. छायाताई सुनील शेलार यांची निवड करण्यात येईल, तर उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवार नंतर जाहीर केला जाईल.
यासोबतच, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, गटनेतेपदी असलेले श्री. संतोष आप्पा मेहेत्रे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि तत्काळ नवीन गटनेत्याची निवड केली जाईल.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना या निर्णयासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button