📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्लास्टिकमुक्त समाजाची गरज – प्रा. तेजस भोरे स्व. एम.ई. भोरे जूनियर कॉलेजमध्ये प्लास्टिक विरोधी प्रतिज्ञा

प्लास्टिकमुक्त समाजाची गरज – प्रा. तेजस भोरे

स्व. एम.ई. भोरे जूनियर कॉलेजमध्ये प्लास्टिक विरोधी प्रतिज्ञा

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिन उत्साहात साजरा

जामखेड दि.३ (प्रतिनिधी):आजच्या युगात प्लास्टिकचा वापर जितका सोयीचा वाटतो, तितकाच तो आपल्या भविष्यासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकविरहित जीवनशैलीचा अंगीकार करावा .प्लास्टिकमुक्त समाजाची गरज आहे, असे प्रतिपादन सनराईज शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. तेजस भोरे यांनी केले.

जामखेड तालुक्यातील पाडळी येथील स्व. एम.ई. भोरे जूनियर कॉलेज, पाडळी येथे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर न करण्याची प्रतिज्ञा करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड-भोरे होत्या. बारावीच्या कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक जनजागृती करत प्लास्टिकविरोधी संदेश दिला.

यावेळी प्रा. विनोद बहिर, प्रा. नारायण आयकर, प्रा. स्वाती पवार, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा. छबिलाल गावित, प्रा. विवेक सातपुते यांच्यासह शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील घाडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप भोंडवे यांनी मानले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी परिसरात प्लास्टिक संकलन व स्वच्छता उपक्रम राबवून प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

Back to top button