बीड

धान्य ते माय बाप ज्यांच्या घरी संत जन्म घेती :- ह भ प श्रावण महाराज जगतप 

धान्य ते माय बाप ज्यांच्या घरी संत जन्म घेती :- ह भ प श्रावण महाराज जगतप
नाथांच्या तपाने पुनीत झालेली भूमी” गोरक्षनाथ टेकडी”
बीड ( प्रतिनिधी) जगात सर्वात भाग्यवान कोण असेल तर ते साधू संतांचे आई वडील आहेत आज ज्या आई वडिलांनी संत साधू बाबा यांना जन्म दिला ज्या आई वडिलांनी किसान बाबा व गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांना जन्म दिला ते आई वडिलांचे भाग्य सर्वात मोठे आहे.     ज्या आई वडिलांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या लेकरांना समाजासाठी अर्पण केलं ते आई वडिलांनी खरंच भाग्यवंत आहेत.असे अभंग विवेचन करताना ह भ प श्रावण महाराज जगताप यांनी धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तन सेवा अर्पण करताना व्यक्त केले
*जास्त पैशाच्या मागे धावण्यापेक्षा मुलांवर संस्कार करावे*
         आई वडिलांनी पैसाच्या मागे लागून आयुष्य खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलांना वेळ देणं गरजेचे आहे मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे त्या मुळे आपला आचरण मुलं करत असतात आई वडिलांनी आचरण सुसंकृत असले पाहिजे मुल नेहमी मोठ्याच आचरण करतात
*आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा*
     समाजात अनेक माणसं आई वडिलांनी आश्रमात सोडतात व अनेक ठिकाणी देव सापडतात लाखो रुपये खर्च करत देव हा आपल्या आई वडिलांच्या सेवेत आहे आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा आहे
चौकट – *आज टेकडी येथे सप्ताह सांगता*
आज दि.20 जानेवारी मंगळवार रोजी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सांगता गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांचे 10 ते 11 प्रवचन व ह भ प अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे कीर्तन दुपारी 12 ते 02 वेळेत संपन्न होणार आहे
*आज महाप्रदाच्या महापांगती*
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सांगता व महाप्रसादाच्या महापंक्ती होणार
Back to top button