बीड

शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या हस्ते अंबडचे उपनगराध्यक्ष विश्वजित खरात यांचा सत्कार

शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या हस्ते अंबडचे उपनगराध्यक्ष विश्वजित खरात यांचा सत्कार

बीड दि.२२ (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माजी आमदार विलासराव खरात यांचे पुत्र विश्वजीत खरात यांची बिनविरोध निवड झाली असून त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी विश्वजीत यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी माजी आमदार विलासराव खरात यांचे पुत्र विश्वजीत खरात यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून विश्वजीत खरात यांनी आज शिवछत्र निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अंबड तालुक्यासाठी खरात परिवाराने खूप मोठे योगदान दिले असून अंबड नगर परिषदेमध्ये विश्वजीत खरात यांच्या नेतृत्वाखाली अंबड शहराचा चेहरा मोहरा बदलेला असा विश्वास शिवाजीराव पंडित यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भवानी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष रऊफभाई, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ मोहोळकर, माजी नगरसेवक विश्वास मनसबदार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राखा, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Back to top button