बीड

भिमसैनिक जामखेड तालुकातर्फे सुदाम वराट यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर

भिमसैनिक जामखेड तालुकातर्फे सुदाम वराट यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर

संविधान महोत्सव:दि. २६ जानेवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरात भिमसैनिक जामखेड तालुका आयोजित १३ वा संविधान महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे, या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून जामखेड न्युजचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुदाम वराट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, बाजारतळ, जामखेड येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले यांनी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास आष्टी, पाटोदा व शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस, आमदार रोहित पवार, प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव तसेच जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुदाम वराट हे गेल्या सतरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पाच वर्षे ‘सकाळ’ दैनिकात काम केले आहे. सध्या ते मागील बारा वर्षांपासून ‘सामना’चे जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून ते ‘जामखेड न्युज’चे संपादक म्हणून जबाबदारीने काम करत आहेत.पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल सुदाम वराट यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

———————————–
पुरस्कार कर्ते

मा. श्री. डॉ. सुशील विष्णुपंत पन्हाळकर – (वैद्यकीय क्षेत्र)
मा. श्री. संतोष भिमाशंकर टेकाळे – (सामाजिक / क्रीडा क्षेत्र)
मा. श्री. सुदाम काशिनाथ वराट – (पत्रकारिता क्षेत्र)
मा. श्री. श्रीकांत बाळकृष्ण होशिंग – (शैक्षणिक क्षेत्र)
मा. श्री. उत्तम अर्जुन पवार – (वृक्ष मित्र)

Back to top button