बीड

तिरुपती आश्रमशाळेत गणवेश व पुस्तकांचे वाटप; बाळराजे पवार यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

तिरुपती आश्रमशाळेत गणवेश व पुस्तकांचे वाटप; बाळराजे पवार यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
गेवराई | प्रतिनिधी
शामराव राठोड गुरुजी यांच्या तिरुपती आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी गणवेश व पुस्तक वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळराजे पवार उपस्थित होते. यावेळी रोहित भैया पंडित यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
                 कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त आणि मेहनतीचे मूल्य याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बाळराजे पवार म्हणाले की, “शिक्षक आणि समाज यांची विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही गरीब समजू नये. जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जात शिक्षणाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडवावे. जिद्द, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या प्रवासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
Back to top button