बीड
रणवीर पंडित युथ फाऊंडेशनचा सामाजिक हातभार; १० गरजूंना १ लाख १९ हजार रुपयांची आर्थिक मदत

रणवीर पंडित युथ फाऊंडेशनचा सामाजिक हातभार;
१० गरजूंना १ लाख १९ हजार रुपयांची आर्थिक मदत
गेवराई दि. २५ (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्त आणि गरजू कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी गेवराई येथे नव्याने स्थापन झालेल्या रणवीर पंडित युथ फाऊंडेशनच्या वतीने १० लाभार्थ्यांना एकूण १ लाख १९ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा युवा नेते रणवीर पंडित यांच्या हस्ते या मदतीचे वितरण करण्यात आले.
विविध संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये धोंडराई येथील दुकान जळीत दुर्घटनेतील जफर काजी व विष्णू बडेकर, कर्करोगग्रस्त खेर्डावाडी येथील विष्णू वाघमारे तसेच गेवराई येथील घर जळीत दुर्घटनेतील अमोल प्रकाश राठोड यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.पल्लवी बाळासाहेब आतकरे, शारदा भागवत परळकर, स्वाती मनोज करांडे (रांजणी), निकिता कृष्ण जाधव (ब्रह्मगाव), सचिन रमेश ननावरे आणि दीपक स्वरिया (जय भवानी कारखाना) यांना प्रत्येकी १२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार देण्याचा फाऊंडेशनचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरत आहे. केवळ आर्थिक मदत न देता अडचणीत असलेल्या कुटुंबांना पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी रणवीर पंडित युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, सचिव राहुल काकडे, खजिनदार अमर बोराडे, सदस्य राहुल मोटे, अजित काळे, अजय येवले, नवीद मशायाक, किरण दाभाडे, मार्गदर्शक संदीप राजगुरू, संदीप मडके, अजीम इनामदार यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()



