चिंचोली माळीत शिवसेनेच्या संघटन व जनसेवा अभियानाचा शुभारंभ

प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, डॉ. प्रतिभा थोरात यांची उपस्थिती
बीड (प्रतिनिधी) शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संघटन व जनसेवा अभियानाचा केज ताुलक्यातील चिंचोली माळी येथे सोमवारी (दि.23) शुभारंभ झाला. शिवसेना उपनेत्या प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. प्रतिभा थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गावागावांत आरोग्य सैनिकांच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जाणार असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.
चिंचोली माळा येथील अभियान शुभारंभ प्रसंगी शिवसेना उपनेत्या प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. प्रतिभा थोरात, शिवसेना केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, माजी उपसभापती सरोजनी ससाणे, ज्येष्ठ नेते अॅड. सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले की, लाडक्या बहिणी शिवसेनेसोबत आहेत. जुन्या शिवसैनिकांचा पुन्हा संघटनेशी संपर्क वाढत आहे. डॉ. प्रतिभाताई यांनी सुरू केलेली संघटन व जनसेवा अभियानाची संकल्पना चांगली असून या माध्यमातून गावातील गरजू, उपेक्षित आणि वंचित लोकांपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचणार आहे. त्यासाठी आरोग्य सैनिक गावपातळीवर काम करतील असे मत व्यक्त केले. तर डॉ. प्रतिभाताई थोरात यांनी चिंचोली माळी सर्कलमध्ये अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे यांनी या भागात संघटनात्मक काम वाढवले असून, कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जयाताई राऊत शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख, आम्रपाली ताई गजेशिव शिवसेना महिला जिल्हा कार्याध्यक्ष, विश्वास बापू जाधव शिवसेना तालुका संघटक, आकाश चाळक शिवसेना युवासेना शहर प्रमुख ,राधाताई हरणावळ शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख, किशोर तात्या थोरात माजी सरपंच कुंबेफळ, मिलिंद गालफाडे शिवसेना नेते तथा सेवानिवृत्त गट विकास अधिकारी, संदीप आव्हाड शिवसेना नेते ,विलास आंबाड शिवसेना बांधकाम कामगार मराठवाडा कार्याध्यक्ष, लालासाहेब शिंदे ज्येष्ठ नेते शिवसेना होळ,ज्योतीराम सावंत पत्रकार हादगाव, राजेंद्र मेटे पत्रकार राजेगाव, योगेश देशमुख शिवसेना उप तालुका प्रमुख केज, ज्ञानेश्वर भांगे युवा सेना उपतालुकाप्रमुख केज ,प्रकाश रोमन युवासेना उपतालुकाप्रमुख केज ,अशोक बाबासाहेब शिंदे शिवसेना विभाग प्रमुख चिंचोली माळी जिल्हा परिषद गट, जालिंदर चंदनशिव शिवसेना गणप्रमुख वरपगाव, सय्यद पाशा रसूल शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख केज शिवाजी गायकवाड युवा सेना उपतालुकाप्रमुख ,बब्रुवान इंगळे गणप्रमुख चिंचोली, अजय तांबे युवासेना गणप्रमुख चिंचोलीमाळी, कृष्णा थोरात सरपंच सातेफळ, डॉ .गणेश चाळक उपसरपंच काळेगाव ,बालासाहेब देशमुख काका वरपगाव ,युवानेते रामहरी कोल्हे केवड,शेख सर लाडेगाव, दत्तूभाऊ आगे माजी सरपंच काळेगाव , चिंचोली माळी गावातील अशोक काळे ,नवनाथ काळे, लताताई अशोक काळे ,वर्षा प्रदीप शिंदे, अक्षय काळे, कावेरी इंगळे ,सुवर्णमाला वडवले ,राणी करंडे ,राजू काळे ,नितीन काळे, मनीषा काळे, सत्वशीला चंदनशिव, सुनिता मुळीक, सुमन महाकुंडे, कमल गुरव, शहाबाई मुळे ,विष्णू काळे, प्रदीप शिंदे, कृष्णा राऊत, चैतन्य काळे ,श्रीकांत काळे, महादेव काळे , बालाजी नन्नवरे. यांची उपस्थिती होती. चिंचोलीमाळी ,साळेगाव ,सतेफळ, मांगवडगाव, लाखा ,हदगाव ,भोपला ,डोका ,सारूकवाडी ,वरपगाव ,कापरेवाडी, केवड ,बोरगाव ,दैठणा ,राजेगाव ,हनुमंत पिंपरी, काळेगाव घाट,आरणगाव, जाधवजवळा, सह चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी बूथ प्रमुख आरोग्य सैनिक बी एल ए सह आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संचालक परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आघाडीच्या प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी शेतकरी सेना युवा सेना महिला सेना कामगार सेना सह परिसरातील शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे यांनी मानले.



