बीड
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा

बीड (प्रतिनिधी)ः सौ. के.एस.के महाविद्यालयात शारिरीक शिक्षण विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. याकार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, प्रत्येक बिकट परीस्थितीवर मात करुन वीर खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक पर्यंत मजल मारली. हे त्यांच्या कडून शिकण्या सारखे आहे. तसेच उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सर्व सोयीसूविधा देण्यासाठी महाविद्यालय कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. ए.एस.खान, कमवि डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भागचंद सानप, डॉ. शेख शकील रहिम, डॉ. ज्ञानेश्वर घोडके, डॉ. प्रियंका नवले, प्रा. अमृतसिंग बिसेन तसेच क्रीडा विभागातील सर्व कर्मचारी तसेच खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.