📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विस्तार अधिकारी संजय नरवडे व मुख्याध्यापक नवनाथ पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

विस्तार अधिकारी संजय नरवडे व मुख्याध्यापक नवनाथ पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

समाजात शिक्षकाचे सर्वोच्च स्थान ; शिक्षकांनी येणाऱ्या संधी चे सोने करावे – दादासाहेब गुंजाळ

जामखेड प्रतिनिधी;-समाजात शिक्षकाला सर्वोच्च स्थान असून शिक्षक मोठा असतो,शिक्षकाचा दर्जा किंवा त्याच्या गुरूतुल्य पदाबाबत तुलना होऊ शकत नाही.आजच्या घडीला मुलांना लवकरच्या संधी ओळखता आले पाहिजे. शिक्षकाने या मुलांना योग्य दिशा व मार्गदर्शन दिले तर ते मुलं पुढे मोठ- मोठे अधिकारी बनून मोठ्या पदावर काम करतील.येणाऱ्या संधी चे शिक्षकांनी सोने करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी केले.

दि.२९ जानेवारी २०२५ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कूल येथे विस्तार अधिकारी संजय नरवडे व पिंपळगाव उंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ पाटील यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
पुढे बोलताना दादासाहेब गुंजाळ म्हणाले की,आज मल्टिमीडियाचे युग आहे, काळाची गरज आहे,अशा सेवानिवृत्तीच्या काळात नाती जपता आली पाहिजेत. एकमेकांना सांभाळल पाहिजे.एकमेकांच्या कामाचं कौतुक केले पाहिजे.
यावेळी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने सेवा पूर्तीच्या निमित्ताने कृतज्ञता निधी विस्तार अधिकारी संजय नरवडे व सप्त्नीक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव उंडा येथील मुख्याध्यापक नवनाथ पाटील यांना ११,००० हजार रुपये चा चेक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, विकास मंडळाचे‌ विश्वस्त व जामखेड तालुका शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मुकुंदराज सातपुते, आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण, बाळासाहेब जरांडे,शिक्षक नेते गोवर्धन दरेकर,विषयतज्ज्ञ शाहू फाळके,मुदस्सीर शेख,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, सेवानिवृत्त शिक्षक नेते ज्ञानोबा थोरात गुरुजी, चंद्रसेन सुरवसे,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा जामखेड शाखाधिकारी मुकुंद ढवळे, प्रमोद पिंपरे, संतोष गोरे, अनंता गायकवाड,नारायण लहाने,विजयकुमार रेणुके, दत्तात्रय आंधळकर,कामिनी राजगुरू, सुवर्णाआंधळकर, अर्चना ढगे,अनिता पवार,रसिका गाढवे, आदी शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील खालील प्रमाणे शिक्षक व शिक्षिकांनी विविध स्तरांवर पुरस्कार मराठी साहित्य संमेलनात निवड, बाळासाहेब जरांडे जि प आदर्श शिक्षक लहू पवार सर उत्कृष्ट रांगोळी कलाकृती सारिका निमसे राज्यसेवा परीक्षेत निवड अनिता पवार, पारुबाई मुसांडे, नामदेव खलसे, चंद्रकांत अरण्ये यांची मिशन आरंभ मध्ये विद्यार्थ्यांची निवड,इस्त्रो सहलीला निवडलेले आलोक ज्ञानेश्वर कौले,यश भोंडवे तसेच सरल लहू बोराटे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव गिते,धीरजकुमार उदमले,बापूसाहेब कोळी, दत्तात्रय आंधळकर,ज्ञानेश्वर कौले,श्रीहरी साबळे,शहाजी जगताप,काकासाहेब कुमटकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त मुकुंदराज सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कौले यांनी मानले.

Back to top button