बीड

माजलगाव औद्योगिक वसाहत जलशुद्धीकरण केंद्र चा वास्तुपूजन कार्यक्रम संपन्न : जालिंदर डावकर 

माजलगाव औद्योगिक वसाहत जलशुद्धीकरण केंद्र चा वास्तुपूजन कार्यक्रम संपन्न : जालिंदर डावकर
बीड // प्रतिनिधी :-माजलगाव औद्योगिक वसाहत पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा वास्तुपूजन व वृक्षारोपण कार्यक्रम माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश आनंदगावकर उपस्थित होते यावेळी जयसिंग भैय्या सोळंके तसेच इतर मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून हा कार्यक्रम पार पडला या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचे टेंडर नावाजलेले प्रकल्प ज्यांनी उभे केले अशा गोरक्षनाथ कन्स्ट्रक्शन यांना मिळालेले आहे अतिशय दर्जेदार व उत्तम काम करून जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित होईल असे आश्वासन गोरक्षनाथ कन्स्ट्रक्शन चे जालिंदर डावकर यांनी दिले
Back to top button