बीड

एसआयआरसाठी ‘बीएलओ’ नियुक्त शिक्षक दारोदारी; विद्यार्थी वाऱ्यावर, शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न ऐरणीवर

एसआयआरसाठी ‘बीएलओ’ नियुक्त शिक्षक दारोदारी; विद्यार्थी वाऱ्यावर, शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न ऐरणीवर
मराठवाड्यात २० हजार शिक्षक एसआयआर कामात; शिक्षकांना अशैक्षणिक कामांत गुंतवून सरकारी शाळा डबघाईला आणण्याचा प्रयत्न –:- डॉ. गणेश ढवळे
बीड:- दि(४) : राज्यात मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी जिल्हा परिषद शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यात सुमारे २० हजार शिक्षक या कामात गुंतल्याने शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणारे जून, जुलै आणि ऑगस्ट हे महिने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात प्रवेश प्रक्रिया, पायाभूत अध्ययन आणि नियमित अध्यापनाला गती मिळणे अपेक्षित असते. मात्र एसआयआर मोहिमेसाठी शिक्षकांना दारोदारी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम देण्यात आल्याने अनेक शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत आहे.
एका शिक्षकाकडे सरासरी हजाराहून अधिक मतदारांची जबाबदारी देण्यात आली असून एका कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी किमान एक तास खर्च होत आहे. त्यामुळे दिवसभर एसआयआरचे काम करून शाळेत अध्यापन करणे शिक्षकांसाठी अवघड बनले आहे. परिणामी प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांशी संवाद आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, शिक्षकांना सातत्याने जनगणना, निवडणुका, मतदार यादी आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी हानी होत आहे. शिक्षणात गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांना वर्गात पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असून सरकारने शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.
**बीड, दि. ४ :** राज्यात मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी जिल्हा परिषद शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यात सुमारे २० हजार शिक्षक या कामात गुंतल्याने शाळांमधील अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणारे जून, जुलै आणि ऑगस्ट हे महिने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात प्रवेश प्रक्रिया, पायाभूत अध्ययन आणि नियमित अध्यापनाला गती मिळणे अपेक्षित असते. मात्र एसआयआर मोहिमेसाठी शिक्षकांना दारोदारी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम देण्यात आल्याने अनेक शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत आहे.
एका शिक्षकाकडे सरासरी हजाराहून अधिक मतदारांची जबाबदारी देण्यात आली असून एका कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी किमान एक तास खर्च होत आहे. त्यामुळे दिवसभर एसआयआरचे काम करून शाळेत अध्यापन करणे शिक्षकांसाठी अवघड बनले आहे. परिणामी प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांशी संवाद आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, शिक्षकांना सातत्याने जनगणना, निवडणुका, मतदार यादी आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी हानी होत आहे. शिक्षणात गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांना वर्गात पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असून सरकारने शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.चौकट : शिक्षक नसल्याने चार वर्ग एकत्र
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात शिकवण्याची वेळ आली आहे. दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकाच शिक्षकावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालकांकडूनही नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती मुळुकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती भाकरे यांनी दिली.
चौकट : “आमच्या लेकरांचं शैक्षणिक नुकसान होत आहे”
मुळुकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी एकाच शिक्षकावर आली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप ढास यांनी व्यक्त केली.मराठवाड्यात
Back to top button