बीड

जामखेड येथे होमगार्ड जवानांना दिपावली निमित्ताने फराळाचे वाटप

जामखेड येथे होमगार्ड जवानांना दिपावली निमित्ताने फराळाचे वाटप

जामखेड प्रतिनिधी :
दिपावली सणाच्या शुभप्रसंगी जामखेड होमगार्ड पथकातील जवानांना तालुका समादेशक नागेश घायाळ यांनी फराळाचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पथकातील पलटन नायक अकबर शेख, आण्णासाहेब पवळ, लिपिक बिभिषण यादव, राजु जाधव, विठ्ठल जाधव, भारत चव्हाण, संजय साळुंके, हरिश्चंद्र पवार, अतुल पवार, शिवाजी सातव, नासीर खान, किरण बांदल, निलेश गायकवाड, जितेंद्र जाधव, गणेश गायकवाड, विलास पवळ, बुध्दाप्पा माने, कुंडल औचरे आदी होमगार्ड बांधव उपस्थित होते.
तसेच महिला होमगार्ड शैला क्षिरसागर, शैला कदम, आशा रूपनर, राखी पवार यांच्यासह इतर मान्यवरांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रसंगी समादेशक नागेश घायाळ यांनी सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत सांगितले की, होमगार्ड हे समाजातील खरे सेवक आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे समाजात सुरक्षिततेची भावना दृढ होते.

Back to top button