गोरेगांव मध्ये कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली भरणार रायगड जिल्ह्याकरिता जनता दरबार

धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर सांभाळणार दरबाराची धुरा
प्रसिध्दी प्रमुख – लवेश साळवी
दि. ०१ मे २०२५, मौजे गोरेगांव, अक्षय तृतीयेचे पावन मुहूर्त साधून, शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर यांच्या पुढाकाराने दि. ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता गोरेगांव मधील पाहिले जनता दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. गोरेगांव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही गेले कित्येक वर्षे जनतेला आपल्या समस्या व अडचणी सांगण्यासाठी कोणतेही अधिकृत व्यासपीठ नव्हते. त्यामुळे जनतेचे हाल होत असताना पाहायला मिळत होते. सदर गोष्टी बाबत धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख श्री दिनेश हरवंडकर यांच्याजवळ चर्चा केली. तद्नंतर ही कल्पना कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांना दिली व त्यांना समजावले कि आपल्या जनतेला न्याय देण्याकरिता, एक हक्काचे व्यासपीठ असणे फार गरजेचे आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मंजुरी देऊन, लागेल ती मदत पुरवली जाईल असे आश्वासन दिले.
गेले कित्येक वर्षे ही संकल्पना धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर यांच्या मनात होती. मुंबई मध्ये ११ वर्षे काम करीत असताना बरेच पक्ष व संघटनांद्वारा संचालित असलेले जनता दरबार व त्यांचे सुरळीत कारभार पाहून, आपल्या शहरात व आपल्या जिल्ह्यात सुद्धा अश्याच प्रकारचे दरबार भरावे अशी इच्छा बर्याचदा कित्येक नेत्यांजवळ त्यांनी व्यक्त केली. परंतू, कोणत्याही नेत्याने व समाजकार्य करीत असलेले समाजवादी कार्यकर्त्याने ही विनंती व मागणी मनावर घेतली नाही.
मुंबई सोडल्या नंतर, ३ वर्षे सातत्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत रायगड जिल्हा संयोजक म्हणुन आदि साहेबांनी हिंदुत्वासाठी प्रामाणिक काम केले. गोरक्षा, धर्मरक्षा, माय भगिनींचे रक्षण करीत जिल्ह्यातील झोपलेले हिंदूंना जागृत केले. अनेक कार्यक्रम, हिंदू संमेलन, मोर्चे, रथ यात्रा इत्यादी रायगड जिल्ह्यात ठिक-ठिकाणी केले. परंतू, धर्मासाठी अहो रात्र काम करून सुद्धा तो समाधान प्राप्त होत नव्हता. रायगड जिल्ह्यात व्यापक कामगिरी केल्यानंतर व जिल्ह्यातील समस्यांचे अंदाज आल्यावर, जनता दरबार चालू करण्याचे निर्णय आपण घेतल्याचे धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर यांनी प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले. दर शनिवारी सायंकाळी ७:०० ते ९:०० वाजेपर्यंत शिवसेना कार्याला गोरेगांव येथे जनतेच्या सेवेसाठी जनता दरबार अखंडितपणे चालू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



