बीड

मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या बाळासाहेब डोंगर भाळवणी यांचा शिवसेना-देवसेना वतीने सत्कार

मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या बाळासाहेब डोंगर भाळवणी यांचा शिवसेना-देवसेना वतीने सत्कार
बीड (प्रतिनिधी )-धानोरा रोड विभागातील शिवसेना तथा देवसेना संपर्क कार्यालयामध्ये बाळासाहेब नारायण डोंगर भाळवणी यांचा मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी वन फिफ्टी अकॅडमीचे सर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटक तथा देवसेना जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर, बहिरवाळ भैया, कळसाने भैय्या यांच्यासह गुजर समाजाचे विविध मान्यवर, समाज बांधव आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार समारंभात बोलताना जिल्हाध्यक्ष रतन गुजर म्हणाले, परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या कठोर मेहनतीमुळे बाळासाहेब यांची पोलीस दलात निवड झाली आहे, परंतु ही केवळ सुरुवात आहे. पुढील प्रवास अजून मोठा आहे त्यांच्या हातून आई-वडिलांची समाजाची सेवा घडो आणि  प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्या मेहनतीचा आदर्श घ्यावा.आपण सर्वांनी मिळून गुजर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे आणण्यासाठी कटिबद्ध राहू. समाजाची ताकद वाढवून प्रत्येक अडचणीच्या वेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. कुठेही अडचण आल्यास आम्हाला हाक द्या, आम्ही तत्काळ पाठिंबा देऊ.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी बाळासाहेब डोंगर यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Back to top button