बीड

तुलसी फॅशन डिझाईन कॉलेजच्या रासेयो शिबिराअंतर्गत आरोग्य तपासणी

तुलसी फॅशन डिझाईन कॉलेजच्या रासेयो शिबिराअंतर्गत आरोग्य तपासणी

बीड (प्रतिनिधी): देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष शिबिराच्या अंतर्गत तालुक्यातील शिवणी येथे मुलींसाठी अनेमिया (रक्तक्षय) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश काकडे व त्यांची आरोग्य टीम उपस्थित होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्यात आले.तपासणीदरम्यान रक्तक्षयाची कारणे, लक्षणे, दुष्परिणाम तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.वृषाली लोखंडे, प्रा.श्वेता वंजारे तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Back to top button