बीड
अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आ.पवार आक्रमक;जामखेडमध्ये खरेदी-विक्री विषयावर आमसभेत जोरदार चर्चा

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आ.पवार आक्रमक;जामखेडमध्ये खरेदी-विक्री विषयावर आमसभेत जोरदार चर्चा
संदीप गायकवाड यांची प्रशासनाला लवकर निर्णयाची मागणी
जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या खरेदी-विक्री विषयासंदर्भात आज आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत प्रशासनाला समोरासमोर बसवून चर्चा झाली. या बैठकीत युवा नेते संदीप (आण्णा) गायकवाड यांनी ठाम भूमिका मांडत संबंधित विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
गायकवाड म्हणाले, हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यावर लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठा दिलासा मिळेल.
आमसभेत उपस्थित अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागामुळे या विषयाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



