बीड
गुरुवर्य किसान बाबानी सुरू केलेल्या सप्ताहाचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष

गुरुवर्य किसान बाबानी सुरू केलेल्या सप्ताहाचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष
गोरक्षनाथ टेकडी येथे नवनाथ बाबा यांच्या हस्ते विधिवत सप्ताहस आरंभ
बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील महान संत गुरुवर्य किसन बाबा महाराज यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहची सुरुवात ह भ प गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्ग दर्शना खाली दि 13 जानेवारी मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे संत, महंत, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत फुले टाकून धर्मनाथा बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आरंभ करण्यात आला
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवर्य किसन बाबा महाराज यांचे प्रतिमापूजन तसेच दीप प्रज्वलन गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कलश पूजन वाद्यपूजन विना पूजन, ग्रंथ पूजन, गाथा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन,संत महंतांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी माळकरी विणेकरी मृदंग वादक गायनाचार्य मृदुंगाचार्य व भाविक भक्त उपस्थित होते. गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील निवासस्थानाचे आज उद्घाटन करण्यात आले
आज पासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हरी किर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन ,हरिपाठ, भावार्थरामायण, विष्णुसहस्रनाम हरिजागर, काकडा भजन भारुड अभंग वाणी अशा पद्धतीचे भक्तीमय कार्यक्रमाच्या आयोजन श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमात करिता भावी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान गुरुवर्य महंत शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे
चौकट:- धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भाविक भक्ताना 24 तास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेले आहे



