बीड

धर्माबाद येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनात्मक भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

धर्माबाद येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनात्मक भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

 

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ३० डिसेंबर 2026 रोजी धर्माबाद येथे रेल्वे स्टेशन परिसरात भव्य बुद्ध भिमगितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य पि.जे. थोटे, उद्घाटक दक्षिण मध्य रेल्वे हैद्राबाद विभागप्रमुख पि. नारायण यांच्या
हस्ते होणार आहे.

६ डिसेंबर रोजी होणारा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम यावर्षी ३० डिसेंबर रोजी होत आहे. नगर परिषद निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे संयोजकांनी कार्यक्रम पुढे घेण्याचे ठरविले होते. सकाळच्या सत्रात १०.५ वाजता रेल्वे स्टेशन प्रबंधक आर.के. उदयकुमार व झोनल प्रसिडेन्ट ए. विनोद यांच्या हस्ते ध्वजारोहण, पुजापाठ भारतीय बौद्ध महासभा तालुका सचिव माधवराव वाघमारे कागंठीकर व डि.जी.गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ६ वाजता अभिवादन सभा व प्रमुख वक्त्यांचे भाषणे, तिसऱ्या सत्रात संध्याकाळी ८.३० वाजता बुलढाणा येथील सुप्रसिद्ध गायिका आशा चावरे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे यांच्या बुद्ध भिम गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक केरबा वाघमारे, निलेश वाघमारे, बळीराम कांबळे, राहुल सिरसे यांनी केले आहे.

Back to top button