📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

‘जरूड’ करांची हाक — “आम्ही येतो; तुम्हीही या” शेतकरी हक्क मोर्चाच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जरूड’ करांची हाक — “आम्ही येतो; तुम्हीही या”
शेतकरी हक्क मोर्चाच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड (प्रतिनिधी):शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकांना रास्त हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या **“शेतकरी हक्क मोर्चा”**च्या जनजागृतीसाठी मौजे जरूड येथे शेतकरी बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हाक देत, “आम्ही मोर्चासाठी येत आहोत, तुम्हीही या” असे आवाहन केले. शेतकऱ्यांचा हा हक्काचा लढा अधिक व्यापक करून शेतकरी एकजूट दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीसाठी बीड येथून शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोकराव येडे व सुहास जायभाय यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचा विश्वास दिला.
या वेळी गणेश काकडे,रामकिसन काकडे, रामकिसन काकडे, ईश्वर काकडे, बाळू नाना काकडे ,गणेश काकडे, सुंदरराव काकडे ,प्रताप काकडे, कोंडीराम काकडे ,सचिन शहामाने, विशाल मुळे, विक्रम काकडे ,रंजीत काकडे, वशिष्ठ काकडे, सचिन काकडे ,विठ्ठल जाधव ,अशोक काकडे, राजेश काकडे, विलास काकडे, नंदकुमार काकडे, रामेश्वर काळे, कल्याण काकडे, ज्ञानोबा काकडे पुत्र, शेतकरी मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button