बीड
बीड पोलीसांची प्रलंबित दंड वसुली मोहीम – 11 लाखांचा प्रलंबित दंड वसूल

बीड (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील प्रलंबित वाहतूक दंडाची वसुली करण्यासाठी बीड पोलीस दलाने आज विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून ही मोहीम पार पडली.
या मोहिमेत पाडळशिंगी टोलनाका, बार्शी नाका, साठे चौक वडवणी, केज टोल नाका, चुंभळी फाटा पाटोदा, गोमाळवाडा फाटा शिरूर, धारुर टोल नाका, बर्दापूर टोल नाका, परभणी टी पॉईंट माजलगाव, ईटके कॉर्नर परळी व आंभोरा चेकपोस्ट या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान 1,340 वाहनधारकांकडून प्रलंबित वाहतूक दंडासह एकूण 11,08,950/- ची वसुली करण्यात आली. ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी, विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.या मोहिमेमुळे प्रलंबित दंड भरणे टाळणार्या वाहनचालकांना धडा मिळून वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण झाली, असे पोलिसांनी सांगितले.