बीड

स्वच्छ व सुंदर प्रभागाचा संकल्प : प्रवीण होळकर दांपत्याकडून महिलांना डस्टबिन वाटप

स्वच्छ व सुंदर प्रभागाचा संकल्प : प्रवीण होळकर दांपत्याकडून महिलांना डस्टबिन वाटप

जामखेड (प्रतिनिधी ): जामखेड शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवत ‘स्वच्छ प्रभाग–सुंदर प्रभाग’ या उपक्रमाला वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. युवा नेते व भाजपा शहरमंडल उपाध्यक्ष प्रवीण होळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ. नंदा प्रवीण होळकर यांनी आपल्या प्रभागातील महिलांना घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी हजारो नागरिकांच्या घरोघरी डस्टबिनचे दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाचे महिलांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत झाले.

तपनेश्वर परिसरासह प्रभागात अलीकडेच अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक त्रास वाढू लागला होता. प्रशासनाला तातडीची मागणी होत असतानाच होळकर दांपत्याने स्वखर्चातून महिलांना डस्टबिन देत एक पाऊल स्वच्छतेकडे टाकले.

आता या डस्टबिन उपक्रमामुळे घराघरातून ओला–सुका कचरा वेगळा ठेवण्याची पद्धत रुजेल.तसेच घर व आपला परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.यापुढेही प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न सुरुच राहतील, असे प्रवीण होळकर यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, रस्ते, नाली व्यवस्थापन, उद्याने, स्ट्रीटलाईट, तसेच महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे यांसह विविध स्थानिक समस्या सोडविण्यासाठी ते कार्यतत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button