नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून काम करणार – समीर चंदन

नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून काम करणार – समीर चंदन
आगामी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार
जामखेड प्रतिनिधी – स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी सतत कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते समीर (भैय्या) चंदन यांनी नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य मानले आहे. प्रभागातील स्वच्छतेची कामे पाहणे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे आणि नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचवणे हाच त्यांचा प्राथमिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
समीर चंदन म्हणाले की, नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून मी प्रभागातील नागरिकांसाठी काम करणार आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यास मी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार आहे.त्यांच्या या प्रतिवचनामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, युवा नेते म्हणून त्यांनी जनसेवेवर भर दिल्याचे दिसून येत आहे. एक सुशिक्षित उमेदवार तसेच सामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य तत्पर असणारे चंदन हे आमदार रोहित पवार यांचे समर्थक म्हणून तालुक्यात ओळख आहे. एक व्यवसायिक व सुशिक्षित चेहरा म्हणून समीर चंदन यांच्याकडे पाहिले जात आहे. आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत जनसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भटक्या समाजातील एक लढाऊ नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नागरिकांनी चंदन यांच्या पाठीशी उभे राहून मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन समीर (भैय्या) चंदन मित्र परिवाराने केले आहे.



