बीड
बीड नगरपालिका भाजपा च्या ताब्यात येणार – नवनाथ शिराळे पाटील

बीड नगरपालिका भाजपा च्या ताब्यात येणार –
नवनाथ शिराळे पाटील
बीड प्रतिनिधी :-बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणा समोर काल चाय पे चर्चा बीड नगरपालिका निवडणूक संधर्भात झाली. या वेळी माजी सभापती नं. प. बीड चे नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी सांगितले की, येणाऱ्या बीड नगरपालिका मध्ये सर्वात जास्त उमेदवार भाजपा चे उमेदवार निवडून आणू अशी कामगिरी आम्ही सर्व भाजपा पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, नेते करणार आहोत. जनतेला आता भाजपा वर विश्वास आहे कारण की केंद्रामध्ये भारत देशाचे माननीय लोकप्रिय मा प्रधानमंत्री नरेंद्र जी भाई मोदी साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सुसंस्कृत तो अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री मुख्यमंत्री नामदार देवेंद्र जी फडणवीस साहेब उर्फ देवा भाऊ साहेब आहेत यांनी सर्व जनहिताच्या महत्त्वाच्या अनेक समस्या सोडल्या असून अनेक महत्वाच्या योजना देखील घरा घरात पोहचविल्या आहेत तसेच सर्वात गजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण अशा अनेक योजना भाजपा ने महाराष्ट्र राज्यातील अनेक नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये राबविल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प अनेक दळणवळणाचे काम केले आहेत मग रेल्वे लाईन असो किंवा विमानतळ असो किंवा छत्रपती संभाजी नगर ते सोलापूर धाराशिव मोठा हायवे असो बीड शहराच्या बाजूचे मोठे मोठे हायवे बायपास असो हे बीड जिल्ह्याच्या भूमि कन्या तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत म्हणून बीड जिल्ह्याची ताकत देखील वाढली आहे. त्यामुळं आता बीड नगरपरिषद मध्ये भाजपा चा झेंडा नक्कीच फडकेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती मा श्री नवनाथ जी अण्णा शिराळे पाटील यांनी आपले अभ्यासपूर्वक विचार व्यक्त करताना सांगितले आहे. या वेळी येथे उपस्थित असलेले महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रेसर असलेला व सर्वांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघांचे मा संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब तसेच येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक न्याय टाइम्सचे मा सह संपादक अनिल जी कचरे साहेब तसेच श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिराचे पुजारी गुरव मामा तसेच महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक तथा दैनिक न्याय टाइम्सचे बीड तालुका प्रतिनिधी तथा साप्ताहिक समीकरण वार्ताचे कार्यकारी संपादक मा श्री संजय जी देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते .



